Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर भाषण

Shikshanachya Mahatva var Bhashan

आधुनिक काळातील विद्येच्या आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी स्त्री शिक्षणाला विरोध असताना सुध्दा समाजातील मुलींसाठी पुण्याच्या शनिवारवाड्यात पहिली शाळा उघडली. अश्या महान आत्म्याला साष्टांग वंदन करून, आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या भाषणाची सुरुवात करतो,

  “  विद्येविना गती गेली    गती विना मती गेली,    मती विना शूद्र खचले    इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

माणसाचं जीवन हे दिव्यासारखं असत आणि विद्या त्या दिव्यातील पेटणाऱ्या वातीसारखी असते, जर माणसाच्या दिव्यासारख्या जीवनात पेटलेली वात नसेल तर ते मानवी जीवन अंधकारमय आहे.  विद्येचे महत्व सांगताना संत महात्मे सांगून गेलेले आहे, त्यापैकी काहींच वर्णन मी खाली करणार आहे.

शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर भाषण – Speech on Importance of Education in Marathi

Speech on Education in Marathi

जसे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की ,

”शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”

म्हणजे आपण विचार करू शकता की ज्या व्यक्तीने संपुर्ण देशाचा कारभार कसा असायला हवा यामध्ये आपले मोलाचे योगदान दिले, आणि तीच व्यक्ती समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगताना शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा देते, म्हणजेच शिक्षणात काहीतरी विशेष असेलच ना, हो शिक्षण आहेच विशेष कारण शिक्षणाच्या बळावर आज व्यक्ती काहीही करू शकतो.

या आधीच्या काळात फारश्या लोकांना शिक्षणाचा लाभ घेता येत नव्हता. आणि त्यामुळे ज्यांच्या कडे शिक्षण नव्हतं त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत होती. त्यामुळे जास्त लोक आपल्या मालकाची चाकरी करत आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असत. माहिलांना तर फक्त “चूल आणि मूल” या नियमात समाजाने बांधले होते.

एका विशिष्ट रेषेच्या बाहेर विचार करणे म्हणजे तेव्हाच्या काळात गुन्हा समजल्या जात असे. पण म्हणतात ना जेव्हाही समाजात अनीती किंवा अत्याचार किंवा काही लोक आपल्या हक्कांपासून वंचित राहतात तेव्हा समाजात एक असा व्यक्ती जन्माला येतो जो त्या समाजात क्रांती घडवून आणतो, आणि समाजाला एका मोठ्या दरीतून बाहेर काढतो. तसेच या कालियुगाच्या समाजाला दरीतून बाहेर काढण्याचे काम क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांनी केले. सर्वदूर शिक्षणाचा अंधकार पसरलेला असताना लोकांचे दगड, धोंडे, शेण आपल्या शरीरावर घेऊन त्यांनी समाजात शिक्षणाच्या प्रकाशाची ज्योत पेटवली.

शिक्षणाचे महत्व माणसाच्या जीवनात खूप मोठे आहे. संत गाडगे बाबा यांनी सुध्दा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला की लोकहो एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण लेकराला शाळेत घाला. थोर महात्म्यांनी शिक्षणाचे महत्व लोकांना, समाजाला पटवून देत देत आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले.

शिक्षणाला माणसाचा तिसरा डोळा म्हटलं जातं. जेव्हा माणसाचा तिसरा डोळा उघडतो त्याला सर्व गोष्टींच ज्ञान झालेलं असत, तो प्रत्येक गोष्टीला अनुभवू शकतो. त्याच प्रमाणे शिक्षण मनुष्याच्या बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचे काम करते.

नेल्सन मंडेला यांनी सुध्दा शिक्षणाचे महत्व सांगताना आपले विचार मांडले. ते म्हणाले होते,

“शिक्षण हे एक प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता.”

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती ज्यांनी संपूर्ण जगाला शिक्षणाचे महत्त्व सांगताना हे उच्चार काढले. की तुम्ही शिक्षणाच्या बळावर संपूर्ण जगाला जिंकू शकता एवढी ताकद शिक्षणात आहे. शिक्षण हे त्या कुऱ्हाडीसारखे आहे जी कुऱ्हाड तुम्हाला जीवनाच्या जंगलातून प्रवास करताना आपल्या उपयोगी पडेल. आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यास मदत करेल.

जिवशास्त्राचे जनक महान अरस्तु यांनी सुध्दा शिक्षणाचे महत्व सांगताना सांगितले आहे की,

”शिक्षणाचे मूळ कडू असू शकतात पण त्यावर येणारे फळे हे गोड असतात.”

शिक्षण माणसाला हुशार बनवते आणि माणसातील क्षमतांना बाहेर काढण्यास मदत करते. ज्या क्षमतांच्या बळावर तो संपूर्ण विश्वाला जिंकण्याची धमक ठेवतो.

अमेरिकेचे महान विचारक जॉन डेव्हे यांनी शिक्षणाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की,

”शिक्षण जीवनाची सुरुवात नसून शिक्षणच जीवन आहे.”

याचा अर्थ असा की जीवनात शिक्षण नसेल तर त्या जीवनाचा अर्थ कवडीमोल आहे. आणि असे कवडीमोल जीवन निरर्थक ठरते, शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट वय असण्याची गरज नसते. की आता तर शिक्षण घेऊच शकत नाही आता तर वय झाले, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की ‘ ‘माणूस हा मरेपर्यंत एक विध्यार्थीच असतो.” म्हणजेच कोणत्याच व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नाही.

फक्त मनात शिकण्याची जिद्द आणि स्वतःवर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, शिक्षण म्हणजे फक्त वह्या पुस्तकांची घोकणपट्टी करणे नाही तर त्या पुस्तकांचा आधार घेऊन चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरक जाणून घेणे आहे.

भगवान गौतम बुद्ध यांनी सुध्दा स्पष्ट शब्दात सांगितले आहे की

‘ ‘दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावयास जे शिकवते तेच खरे शिक्षण होय.”

शिक्षण मनुष्याला आतून आणि बाहेरून शिक्षित करण्याचे काम करत असते. सोबतच माणसाला नम्र बनविण्याचे काम शिक्षणच करते. आणि विद्या सुध्दा नम्र असलेल्या व्यक्तीवर शोभून दिसते. म्हणून म्हणतात न

“विद्या विनयेन शोभते .”

जसे एखाद्या झाडाला अनेक फळं लागलेले असतात ते झाड कसे नम्रपणे खाली झुकलेलं आपल्याला दिसते त्याच प्रमाणे विद्या माणसाला त्याच्या जीवनात नम्र बनविण्याचे कार्य करते. म्हणून म्हणेल

“एकवेळ हे वाघिणीचे दूध पिऊन तर पहा मग अंगामध्ये कसे भिनभिनत ते लक्षात येईल.”

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

आशा करतो लिहिलेले हे भाषण आपल्याला शिक्षणाचे महत्व समजण्यासाठी उपयोगी येतील. अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

सावित्रीबाई फुले जयंती भाषण

सावित्रीबाई फुले जयंती भाषण

Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले जयंती भाषण - Savitribai Phule Speech in Marathi दरवर्षी दिनाकं ३ जानेवारी ला...

Rajmata Jijau Speech in Marathi

स्वराज्य संप्रेरिका माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या विषयी तडफदार भाषण

Rajmata Jijau Speech in Marathi Rajmata Jijau Speech in Marathi स्वराज्य संप्रेरिका माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या विषयी तडफदार भाषण...

Speech on Dr Babasaheb Ambedkar in Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण

Speech on Dr. Babasaheb Ambedkar in Marathi आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि माझे वर्ग मित्र. मी...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Nibandh

Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय.  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या नक्कीच उपयोगात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहितीपर लेख आवश्यक असेल तर आपण bhashanmarathi.com या आमच्या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

speech writing marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही Bhashan Marathi या वेबसाइट वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध (Marathi Nibandh) आवश्यक असेल तर आपण त्याला या page वर प्राप्त  शकाल. 

या पोस्ट मध्ये दिलेले  Marathi Essay Topics  मध्ये आपण एखादा नवीन निबंध पाहू इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

speech writing marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

speech writing marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

MarathiPro

मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..

मराठी भाषण कसे करावे? – असं म्हणतात कि, “कवी हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही, पण वक्ता मात्र घडवता येऊ शकतो”. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असा म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सुविचार, उच्चार, आचार, प्रचार हे प्रभावी वक्ता होण्यासाठी आधारस्तंभ आहेत, त्यामुळेच तर वक्त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचत असते. वक्त्याला त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या विचारावरून, आवाजावरून, आणि बोलण्याच्या कौशल्यावरूनच ओळखले जाते. राजकारणी असो कि शिक्षक असो, आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा भाषण हा सर्वोत्तम मार्ग आहे. ह्या पोस्टमध्ये आपण योग्य रित्या मराठी भाषण कसे करावे? हे आज आपण पहाणार आहोत..

११. समारोप / भाषणाचा शेवट कसा करावा?

मराठी भाषण कसे करावे.

भाषण करण्यासाठी लागतो आत्मविश्वास, ज्ञान. या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतील तो सभा गाजवणारच यात तिळमात्रही शंका घेता येणार नाही. मराठी भाषण कसे करावे हा प्रश्न सर्व-सामान्यांना नेहमीच पडतो. जेव्हा त्यांना इतरांसमोर आपले विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा खरी तारांबळ उडते. “वक्ता दशसहस्त्रेषु” असे जरी म्हणले जात असले तरी, एक उत्तम वक्ता होणे हि काळाची गरज आहे म्हणूनच या लेखात आपण मराठी भाषण कसे करावे? भाषणाची सुरुवात कशी करावी? भाषण देताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे? प्रभावी वक्ता होण्यासाठी काय करावे लागते? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उकल करणार आहोत. चला तर मग लेख पूर्ण वाचूया!

भाषणाची सुरुवात कशी करावी?

१. आत्मविश्वास निर्माण करणे :.

भाषण करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय तुम्ही तुमचे पाऊल पुढे टाकूच शकत नाही. साधा भाषणाचा विचार करायचा म्हणलं तरी मनात प्रश्न येतो कि, मला हे जमेल का? लोक काय म्हणतील? मी विसरलो तर? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मनातच चालू होतो. हे लक्षण आत्मविश्वास कमी असण्याची आहेत. त्यामुळे पहिले आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. सर्वप्रथम स्वतः मध्ये इतरांविषयी, समोरच्या लोकांबद्दल आपुलकीची भावना विकसित करायला शिका. आता तुम्ही म्हणाल कि याचा भाषणाची काय संबंध आहे? तर तसे नाहीए. हे बघा! माणूस आपल्या लोकांसमोर म्हणजेच आई, वडील, भाऊ, मित्र यांच्यासमोर बोलायला घाबरतो का? नाही ना! कारण त्यांच्यासमोर बोलायचं आपल्याला आत्मविश्वास असतो. माणूस तेव्हाच बोलायला घाबरतो जेव्हा तो इतरांसमोर असतो. जर तुम्हाला समोरचे आपलेच वाटले तर तुम्ही सरळ भाषण देऊ शकाल. आत्मविश्वास असल्यास आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात.

२. भाषणासाठी विषय/ मुद्दे कसे निवडावे?

भाषणे देण्यासाठी आपल्याकडे ज्ञान आणि संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा कोणत्याही विषयावर भाषण करायचे असल्यास त्या विषयाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. सखोल विषय ज्ञान असल्याशिवाय भाषण करणे म्हणजे जगाला आपले अज्ञान दाखवणे होय. आपले ज्ञान हाच आपला आरसा असतो. भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी अभ्यास तर कराच पण माहिती पण गोळा करा. त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करा. आणि सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे माहिती ही विश्वासू ठिकाणावरून घ्यावी म्हणजे माहिती खरी असणे महत्वाचे आहे. वादग्रस्त मुद्दे आपण कटाक्षाने टाळले पाहिजेत. तटस्थ राहून भाषण करता आले पाहिजे. जर एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार असाल तर असा विषय निवडा जो तुम्हाला ज्ञात आहे तसेच त्या निवडलेल्या भाषणाच्या विषयावर आपल्याला दृष्टिकोन आणि मुद्दे परीक्षकांना व प्रेक्षकांना समजावून सांगता आले पाहिजे. शक्यतो प्रेक्षकांना आवडतील तसेच त्यांना ज्ञान असलेल्या विषयावर भाषण केल्यास चांगला प्रतिसाद मिळतो.

३. श्रोत्यांबद्दल माहिती :

श्रोते म्हणजे ऐकणारे प्रेक्षक तसेच यामध्ये परीक्षक देखील येतात. भाषण ऐकणारे कोण आहेत हे आपण ओळखले पाहिजे. वरील मुद्यात सांगितल्या प्रमाणे श्रोत्यांची बौद्धिक पातळीप्रमाणे त्यांच्यासमोर विषय मांडायचा असतो. तुमचा अभ्यास कितीही असला तरी समोरच्या श्रोत्यांची ते ग्रहण करण्याची क्षमता आहे का हेही पाहणे तितकेच गरजेचे असते नाहीतर त्यांच्या डोक्यावरून पाणी जाईल. समजा समोर लहान मुले बसली आहेत तर त्यांना राजकारणाचे धडे देत असाल तर ते त्यांना समजणार कसे? असे समोर तरुणाई बसली असेल तर त्यांना अध्यात्मिक गोष्टीत रस वाटणे अवघड नाही का? श्रोत्यांना आवड असली तर ते मनापासून तुमचे भाषण ऐकतील. त्यातील माहिती ग्रहण करतील. त्यामुळे आपले श्रोते कोण आहेत, त्यांची गरज काय आहे हे वक्त्याला समजणे गरजेचे आहे .

मराठी भाषण करतेवेळी कोणती काळजी घ्यावी

४. विषय सादरीकरण :

कोणताही विषय श्रोत्यांसमोर मांडताना सुरुवात खूप महत्वाची असते. विषयाची प्रस्तावना, विषयाचा गाभा, उद्दिष्ट, समारोप या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तुम्ही सरळ मुद्दा बोलू शकत नाही कारण जर असे केले तर श्रोत्यांना ते कंटाळवाणे वाटू शकते. जवळ जवळ वक्त्यांच्या मनात भाषणाची सुरुवात हे भीती असते. चांगली सुरुवात करण्यासाठी काय करावे? सुरुवातीला काय बोलू? चारोळी सांगू कि हेच वक्त्याला समजत नाही. भाषणाची सुरुवात करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत ते आपण बघूया.

१. पारंपरिक सुरुवात – मुख्यत्वे प्रत्येक वक्ता यानेच सुरुवात करतो. यात मुख्यत्वे अध्यक्षस्थानी जे आहेत त्यांचे नाव सर्वप्रथम, प्रमुख पाहुणे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नवे आणि शेवटी श्रोते, बंधू भगिनी, मित्र आणि मैत्रिणींनो अशी सुरुवात केली जाते.

२. प्रसंग सांगून सुरुवात- कोणताही प्रसंग सांगून सुरुवात करता येते. प्रसंग तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहेत त्याच्याशी संबंधित असायला हवा. अशा वेळी क्षणार्धात श्रोत्यांचे लक्ष वेधले जाते. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो जसे कि विनोद, सुखदुःख, मस्ती, आनंद इ. प्रसंग भाषणाच्या वेळेवर अवलंबून असावा. थोडक्यात सांगता येण्यासारखा प्रसंग निवडावा जेणेकरून थोडक्यात पण नेमकी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचेल.

३. चारोळी, म्हण, कविता, सुविचार याने सुरुवात – विषयाशी निगडित म्हण किंवा चारोळी असणे आवश्यक आहे. यामुळे समोरच्या माणसाला भाषणाचा मुद्दा थोडक्यात समजावता येतो. तसेच छोट्या संदेशातून प्रेरणाही मिळते.

४. विनोद सांगून भाषणाची सुरुवात- सुरुवातीलाच तुम्ही श्रोत्यांना हसवले तर श्रोत्यांनी भाषणाला सहमती दर्शवली असे म्हणता येते. तेथून पुढे भाषणावर चांगली पकड राहते. विनोद सांगण्याची सवय असावी. छोट्या छोट्या विनोदांचा अभ्यास करा. अधूनमधून गंभीर विषय झाल्यानंतर थोडी शैली बदला आणि श्रोते गंभीरपणा विसरून खळखळून हसायला लागतील.

५. भाषणाचे पाठांतर :

भाषणाचे पाठांतर असणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपल्याला आपल्या श्रोत्यांशी संवाद सादत किंवा नजरेला नजर देऊन भाषण करायचे असल्यास आपल्याला भाषणातील मुद्दे पाठ असावे लागतात. एखाद्या पानावरील अगोदरच लिहून आणलेले भाषण ऐकण्यास रुची येत नाही. उदाहरण बघायचे असल्यास आपण आपले माजी पंतप्रधान श्री. मनमोहन सिंग आणि सध्याचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी याचे घेऊ शकतो. श्री. मनमोहन सिंग जी शक्यतो अगोदर लिहून आणलेले भाषण सादर करायचे पण श्री. नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत हे फारसे दिसून येत नाही. त्यामुळे श्रोत्यांमध्ये आपला संदेश योग्य रित्या जातो तसेच ऐकणाऱ्यास कंटाळा देखील येत नाही. जर मुद्दे कठीण असतील किंवा भाषांकर्त्याला मुद्दे मांडण्यास अडथळे येत असतील किंवा पक्के पाठ नसेल तर बघून आपले मुद्दे देखील मांडू शकता.

Marathi Speech Tips

६. विशिष्ट भाषाशैली :

भाषाशैलीचा विचार करताना आपल्यासमोर कोणत्या भागातील लोक आहेत हे हि पहिले पाहिजे. जर शहरातील असतील सुशिक्षित असतील तर भाषा त्या प्रकारचीच असावी. जर आपल्यासमोर खेड्यातील लोक असतील तर गावरान भाषेत बोलावे म्हणजे त्यांना वक्ता आपल्यातीलच एक वाटतो व भावना सरळ जाऊन मनाला भिडतात. भाषेत ओढ असते ती ओढ आपल्या बोलण्यात असली पाहिजे. सरळ आणि सोपी भाषा वापरावी. उगाचच नको तिथे इतर भाषांचा वापर करू नये. भाषण करताना महत्वाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे भाषण पूर्ण नकारात्मक नसावे. आपण नाकारात्मकतेने भाषण केले तर समोरच्या माणसाला ते ऊर्जा देणारे नाही ठरू शकणार त्याचप्रमाणे अति साकारात्मकही नसावे. दोन्ही मध्ये योग्य मध्य साधलेला असावा. आपल्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्या बोलण्यातून इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, तरच आपला भाषण आपला ठसा उमटवून जात. आपल्यात जे नाही, ते उगाचच छाप पाडण्यासाठी करू नये. उदा. भाषणात विनोद करणे सर्वांना जमत नाही, त्यामुळे विनोद करणे काही वेळेस फुस्स होऊ शकते किंवा भाषणात मोठ्यांचे ‘कोट’ वापरणे सर्वांना जमेलच असे नाही. आपण आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे बोलावे . प्रत्येकाची बोलण्याची एक ढब असते. कोणी आवेशात बोलत, तर कोणी शांतपणे. आपापल्या मूळ शैलीला अनुसरून बोलावं उगाच कोणाची कॉपी करू नये. वक्त्याचे शब्दोच्चार स्पष्ट आणि स्वच्छ असावेत. उच्चरला जाणारा प्रत्येक शब्द योग्य पद्धतीने आणि सुस्पष्ट रीतीने उच्चरला गेला म्हणजे श्रोत्यांना तो नीट कळतो

७. भाषण रंगवणे :

तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतील तर भाषण रंगते. श्लोक, दोहा, म्हणी, वाक्प्रचार, ओव्या, शायरी, कवितेच्या ओवी वक्त्याने योग्य वेळी व योग्य संदर्भ देताना मांडले ते श्रोत्यांची टाळी पडल्यावाचून राहणार नाही. तसेच भाषण करताना हातवारे करणे, हावभाव करणे, श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरे मागवणे यामुळे ऐकणारे कंटाळा करत नाहीत. ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही स्पर्धेच्या दिवशी भाषण कराल त्यादिवशी जर एकाच जागी उभे राहून बोलायचे असेल तर दोन पायांमध्ये योग्य अंतर ठेवा. स्टेजच्या वापर करण्याची संधी असेल तेव्हा स्टेजच्या वापर करा. एकाच ठिकाणी उभे असल्यास दोन्ही पायांवर समान भार द्यावा. आवाजात चढ उतार असावा. चेहऱ्यावर हावभाव असणे आवश्यक आहे तसेच देहबोली चा योग्य वापर करावा. आपली नजर सर्वांवर फिरवावी फक्त एकटक पाहू नये. तुमच्या भाषणामध्ये चारोळ्या, , कथा, प्रसंग, माहितीचे वर्णन, दाखले, कविता, आकडेवारी, इ. विषयानुसार आवश्यक तो मसाला असावा. आपण जे बोलणार आहोत ते श्रोत्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले पाहिजे, कोणत्याही भाषणाचे अथवा व्याख्यानाचे हे अंतिम उद्दिष्ट असते. म्हणून भाषण करताना मोकळ्या जागेकडे अथवा आकाशाकडे तुमची नजर लावू नका. समोरील श्रोत्यांकडे पाहत त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवत ठासून बोला. वरील सर्व गोष्टींचा वापर केल्यास स्पर्धेच विजेते तुम्हीच झालात म्हणून समजा.

८. भारदस्त/दमदार आवाज :

वक्त्यांचा आवाज हि त्याला मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे. पूर्वी ज्या वेळी ध्वनिक्षेपकासारखी साधने नव्हती तेव्हा वक्त्यांचा आवाज दणदणीत असावा अशी अपेक्षा केली जायची. आवाजात चढउतार महत्वाचा असतो. काही महत्वाची माहिती देताना किंवा महत्वाची वाक्ये बोलताना त्यावर भर देणे गरजेचे असते. म्हणजे श्रोत्यांच्या लक्षात येते कि हे वाक्य महत्वाचे आहे आणि ते त्यांच्या लक्षात राहते.

९. प्रसंगावधान राखणे :

हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. जसे पाऊस आल्यास लोकांना मैदान न सोडण्यासाठी भावनिक आवाहन करणे, चालू सभेत काही कारणाने गोंधळ झाल्यास श्रोत्यांना शांतता राखण्यास सांगून पुन्हा आपल्या विषयाकडे एकाग्र करणे, सहवक्त्यांशी जवळीक वाढण्यासाठी त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या सूत्रांचे आपल्या भाषणात कौतुक करणे, आयोजकांच्या चांगल्या सूत्रांचे कौतुक करणे, अशा प्रकारे प्रसंगावधान ठेवून आपण मोठमोठ्या प्रतिकूल प्रसंगांवर मात तर करूच शकतो; पण योग्य वेळी योग्य सूत्र मांडून अनेकांशी जवळीकही साधू शकतो. तसेच पत्रकार परिषदेसारख्या ठिकाणी प्रसंगावधान ठेवल्यास आपली भूमिका नेमक्या वेळेत आणि स्पष्टपणे मांडू शकतो.

१०. भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे :

कोणत्याही गोष्टींमध्ये वेळेला जितके महत्व असते तितकेच महत्व भाषणामध्येही महत्वाचे आहे. भाषण उगाचच ताणलेले नसावे. त्यात मुद्देसूद आणि टप्प्याटप्प्याने माहिती असावी. जेणेकरून श्रोत्याला भाषण रटाळ वाटणार नाही. मोजक्या वेळात मोजकी आणि महत्वाची तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करायचा. श्रोत्यांच्या लक्षात राहील असे काही प्रसंग थोडक्यात सांगायचे. भाषणाचा वेळ शब्दसाठा वाढवल्याने वाढतो. माणसाच्या शब्दात जर सौजन्य असेल तर त्याची साऱ्या जगासोबत मैत्री होऊ शकते. शब्दाला धार तर हवीच पण आधारही असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेवढे तुमच्या शब्दांचे वजन वाढवलं, शब्द साथ वाढवलं तेवढे भाषण प्रभावी आणि जास्ती वेळ रंजकपणे चालेल. वक्ते कधीकधी भाषणात शब्दांच्या आणि मुद्द्यांच्या गुंत्यात इतके गुरफटून जातात कि त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन जाते. निर्धारित वेळ टाळून गेलेली असते. समारोप करायचा राहून जातो. म्हणून एकाच भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्याचं मोह टाळून शेवटच्या मिनिटात समारोपाकडे यावे आणि भाषणाचा शेवट करावा.

मराठी भाषण टिप्स

कोणत्याही गोष्टींमध्ये वेळेला जितके महत्व असते तितकेच महत्व भाषणामध्येही महत्वाचे आहे. भाषण उगाचच ताणलेले नसावे. त्यात मुद्देसूद भाषणाची सुरुवात जशी महत्वाची असते तसाच शेवटही महत्वाचा असतो. भाषणाचा समारोप म्हणजे निष्कर्ष काढणे. संपूर्ण भाषणाचा गाभा हा समारोपात सामावलेला असतो. तुम्ही या भाषणातून काय घेऊ शकता किंवा काय घेतले पाहिजे हे समारोपातून बोलायचे असते. शेवटी सर्वांचे आभार मानून आपल्या भाषणाची नम्रपणे सांगता करायची. समारोप करतानाही चारोळी,शायरी,सुविचार वगैरेसुद्धा तुम्ही म्हणू शकता. शेवट करताना ज्यांनी तुम्हाला बोलायची संधी दिली त्यांचे आणि ज्यांनी तुम्हाला शांतपणे ऐकून घेतला त्यांचेही आभार मानायला विसरायचे नाही. हा उपक्रम पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन देऊन सावकाशपणे आपल्या जागेवर बसावे.

व्यासपीठावर टाळायच्या गोष्टी:

मराठी भाषण कसे करावे? याच सोबत काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या व्यासपीठावर उभे असताना टाळणे गरजेचे असते. जसे कि,

१. नाकाला, चेहऱ्याला कोठेही वारंवार हाताने खाऊ नये. किंवा केसांना पुन्हा पुन्हा सावरू नये. २. पाय सारखे हलवू नये किंवा कोणत्याही एकाच पायावर उभे राहू नये. उभे राहताना दोन्ही पायावर सामान भर टाकून उभे राहावे. पाठीचा पोक न काढता ताठ उभे राहून बोलावे म्हणजे आत्मविश्वास वाढतो. ३. शक्यतो बूट वापरावेत, त्याची लेस व्यवस्थित बांधलेली असावी परंतु जर चप्पल घटली असे तर त्याच्याशी सारखे पायाने खेलत बसू नये. ४. रुमालाचा अति वापर टाळावा. शर्टच्या बटणांची खेळणे, चष्म्याची कधी घाल करणे, या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात ५. भाषण लिहिलेला कागद किंवा त्यांच्या नोंदी उघडून पाहणे. हातातील पेन खाली पडून शोधणे अशा अनावश्यक कृती टाळाव्यात.

आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त करून देणारा एक महत्वाचा पैलू म्हणजे वक्तृत्व होय. वक्तृत्वाने व्यक्तमत्वाची ओळख फार लवकर होते. म्हणूनच जनसंपर्कासाठी वक्तृत्वासारखे माध्यम नाही. प्रा. अत्रे , वि. स. खांडेकर , पु. ल. देशपांडे , प्रबोधनकार ठाकरे , छ. शिवाजीराजे भोसले इ. तर राजकीय क्षेत्रात अटलबिहारी वाजपेयी, राजीव दीक्षित, प्रमोद महाजन तसेच अविनाश धर्माधिकारी, विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी, यासारखे वक्त्यांची भाषणे सतत ऐकावी आणि सराव करावा. बोलण्याची पद्धती, दिलेली उदाहरणे, प्रश्नांना उत्तरे हे सर्व टिपून ठेवा आणि त्याचा अभ्यास करा. याप्रमाणे प्रत्येक भाषण देणाऱ्या वक्त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे वक्त्यासाठी आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि परिणामकारक कसे करता येईल याचा विचार करावा. “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” हि उक्ती लक्षात घेऊन प्रयत्न करावा. भाषण हि कला आहे आणि कष्ट केल्याशिवाय आत्मसात होणार नाही.

आशा करतो तुम्हाला मराठी भाषण कसे करावे? हि पोस्ट तुम्हाला तुमच्या पुढील भाषणांसाठी नक्कीच उपयोगी पडेल. जर आपल्याला एखाद्या विषयावर लेख किंवा मराठी निबंध , भाषण हवे असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

याचसोबत खालील निबंध आणि भाषणे वाचण्यास विसरू नका. तसेच भाषण आवडल्यास शेयर करायला अजिबात विसरू नका.

इतर विषयांवरील निबंध आणि भाषणे :

१.  शिक्षक दिन भाषण (Teachers Day Speech in Marathi)

२.  व्हॅलेंटाईन आणि 21 व्या शतकातील नाती (निबंध)

३.  निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi)

४.  छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये

५.  पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi)

६.  निबंध: रंगपंचमी (रंगपंचमी Essay in मराठी)

भाषण करण्यासाठी लागतो आत्मविश्वास, ज्ञान. या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतील तो सभा गाजवणारच यात तिळमात्रही शंका घेता येणार नाही. मराठी भाषण कसे करावे हा प्रश्न सर्व-सामान्यांना नेहमीच पडतो. जेव्हा त्यांना इतरांसमोर आपले विचार मांडण्याची वेळ येते तेव्हा खरी तारांबळ उडते. “वक्ता दशसहस्त्रेषु” असे जरी म्हणले जात असले तरी, एक उत्तम वक्ता होणे हि काळाची गरज आहे म्हणूनच या लेखात आपण मराठी भाषण कसे करावे?

भाषण करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय तुम्ही तुमचे पाऊल पुढे टाकूच शकत नाही. साधा भाषणाचा विचार करायचा म्हणलं तरी मनात प्रश्न येतो कि, मला हे जमेल का? लोक काय म्हणतील? मी विसरलो तर? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मनातच चालू होतो. हे लक्षण आत्मविश्वास कमी असण्याची आहेत. त्यामुळे पहिले आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.

भाषणे देण्यासाठी आपल्याकडे ज्ञान आणि संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा कोणत्याही विषयावर भाषण करायचे असल्यास त्या विषयाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. सखोल विषय ज्ञान असल्याशिवाय भाषण करणे म्हणजे जगाला आपले अज्ञान दाखवणे होय. आपले ज्ञान हाच आपला आरसा असतो. भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी अभ्यास तर कराच पण माहिती पण गोळा करा. त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करा. आणि सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे माहिती ही विश्वासू ठिकाणावरून घ्यावी म्हणजे माहिती खरी असणे महत्वाचे आहे. वादग्रस्त मुद्दे आपण कटाक्षाने टाळले पाहिजेत. तटस्थ राहून भाषण करता आले पाहिजे.

संपूर्ण भाषणाचा गाभा हा समारोपात सामावलेला असतो. तुम्ही या भाषणातून काय घेऊ शकता किंवा काय घेतले पाहिजे हे समारोपातून बोलायचे असते. शेवटी सर्वांचे आभार मानून आपल्या भाषणाची नम्रपणे सांगता करायची. समारोप करतानाही चारोळी,शायरी,सुविचार वगैरेसुद्धा तुम्ही म्हणू शकता. शेवट करताना ज्यांनी तुम्हाला बोलायची संधी दिली त्यांचे आणि ज्यांनी तुम्हाला शांतपणे ऐकून घेतला त्यांचेही आभार मानायला विसरायचे नाही. हा उपक्रम पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन देऊन सावकाशपणे आपल्या जागेवर बसावे.

9 thoughts on “मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!..”

Rajkia bhashan

Please send me speech on mobile shop inauguration in marathi

मला वरिल वाचनातून खुप काही नवीन गोष्टी कळाल्या. खुप छान पोस्ट आहे.

रक्तदान या विषय भाषण कसे करावे

Very very very well , I like this post

Very udeful tips

Khup chhan mahiti

खुप छान सर भाषण कसे करावे या लेखामुळे एक प्रोत्साहन मिळाले धन्यवाद

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

COMMENTS

  1. मराठी प्रेरणादायी भाषणे

    यशस्वी लोकांचे प्रेरणादायी भाषण मराठी (motivational speech in marathi) घेऊन आलेलो ...

  2. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर भाषण

    Speech on Importance of Education in Marathi, Importance of Education in Marathi, Shikshanachya Mahatva var Bhashan in Marathi Language - शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुंदर भाषण

  3. जीवनाचे महत्व भाषण मराठी, Speech On Life in Marathi

    Speech on life in Marathi: जीवनाचे महत्व भाषण मराठी, jivanache mahatva bhashan Marathi या विषयावर माहिती हवी असेल तर हा लेख उपयोगी आहे.

  4. 100+ मराठी विषयावरील निबंध

    वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय.

  5. Motivational Speech In Marathi

    Best motivational speech in marathi (प्रेरणादायी भाषण मराठी 1) Arnold Schwarzenegger Motivational speech

  6. भाषण कसे करावे ? भाषणाची सुरुवात कशी करावी

    भाषण कसे करावे ? how to give speech in marathi योग्य विषय निवडा कोणालाही चांगले भाषण देण्यासाठी योग्य विषय निवडणे महत्वाचे आहे.

  7. मराठी भाषण कसे करावे? मराठी भाषणासाठी लागणाऱ्या 11 महत्वाच्या टिप्स!

    निबंध: कोरोना महामारी (Corona Essay in Marathi) ४. छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी मध्ये. ५. पावसाळा निबंध मराठीमध्ये (Essay on Rainy Season in Marathi) ६.

  8. एकत्र करा (9+ सुंदर भाषणे)

    मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण मराठी भाषण Mulinche Shikshan Pragatiche Lakshan Speech In Marathi मी पेन्सिल बोलत आहे Autobiography Of A Pencil In Marathi

  9. शिक्षणाचे महत्व मराठी भाषण, Speech on Importance of Education in Marathi

    शिक्षणाचे महत्व लहान मराठी भाषण, Speech on Importance of Education in Marathi. येथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्रांनो आणि शिक्षकांनो, मी आज शिक्षणाचे महत्त्व यावर एक लहान भाषण देऊ ...

  10. संविधान दिन भाषण (9+ सुंदर भाषणे)

    Categories Constitution Day, Indian Constitution, Marathi Language, Public Speaking, भाषणे राष्ट्रीय विज्ञान दिवस मराठी भाषण (9+ सुंदर भाषणे) | Rashtriya Vidnyan Din Speech In Marathi